माझयाविषयी थोडेसे
मी शासकीय शाळेतील एक प्राथमिक शिक्षिका. मला ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन तेथील माहिती जाणून घेणे खूप आवडते. मला विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार शिकवणे आवडते. मी मुलांच्या शैक्षणिक तसेच सर्वांगीण विकासासाठी नेहेमी प्रयत्नशील असते. मला सामाजिक कार्यात रस आहे. मी अनेक सामाजिक संस्थांशी जोडली गेली आहे, ज्यामुळे मला समाजकार्यात नेहेमी सक्रिय राहता येते. मी उच्च शिक्षित असून माझी मुले, माझे विद्यार्थीही शिकून उच्च पदावर जावेत असा माझा नेहेमीच प्रयत्न असतो. माझी संपूर्ण सेवा हि ग्रामीण भागात झाली असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक अडचणींची मला जाणीव आहे व मी नेहेमी त्या सोडविण्याकडे प्रयत्नशील असते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा